सुरक्षा रक्षकच तीर्थ म्हणून विकत आहेत चंद्रभागेचे पाणी

विठुरायाच्या पंढरीत धक्कादायक प्रकार उघड

सुरक्षा रक्षकच तीर्थ म्हणून विकत आहेत चंद्रभागेचे पाणी

सोलापूर: प्रतिनिधी 

महाराष्ट्रसह कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायांच्या पंढरीत पवित्र मानल्या जाणाऱ्या चंद्रभागेच्या पाण्याची देवस्थानच्या सुरक्षारक्षकांकडूनच तीर्थ म्हणून विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीला आली आहे. 

पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना विठोबा रखुमाईच्या दर्शनाची जेवढी आस असते तेवढीच ओढ गंगेप्रमाणे पवित्र मानल्या जाणाऱ्या चंद्रभागेतील स्नानाची असते. सध्याच्या काळात पंढरपुरात पूरस्थिती आहे. त्यामुळे भाविकांना सर्वभागेच्या पात्रात प्रवेश करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. चंद्रभागेच्या काठावर बॅरिगेट्स उभे करण्यात आले आहेत. 

या बाबीचा गैरफायदा घेऊन देवस्थांचे सुरक्षारक्षकच चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री करत आहेत. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हयरल झाला आहे. देवस्थानच्या सुरक्षारक्षकांबद्दल यापूर्वी देखील अनेक प्रकारच्या तक्रारी भाविकांकडून करण्यात आले आहेत. मात्र, देवस्थान व्यवस्थापनाने वेळीच कारवाई करण्यात येत नसल्यामुळे भीड चेपलेले सुरक्षा रक्षक आणखी वेगवेगळे गैरप्रकार सराईतपणे करीत असल्याचा स्थानिकांचा आणि भाविकांचा आरोप आहे. 

हे पण वाचा  शनि शिंगणापूर गैरव्यवहार प्रकरणी दोन कर्मचारी जाळ्यात

देवस्थानच्या सुरक्षेची जबाबदारी भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) कंपनीकडे कंत्राटी पद्धतीने सोपवण्यात आली आहे. मात्र, ही जबाबदारी पार पाडताना कंपनीचे सुरक्षा रक्षक अनेक प्रकारचे गैरप्रकार करीत असल्याचा आरोप वारंवार करण्यात आला आहे. याच कंपनीकडे अनेक धार्मिक, सांस्कृतिक स्थळे, शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आस्थापनेची सुरक्षा करण्याचे कंत्राट आहे. 

About The Author

Advertisement

Latest News

मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
मुंबई: प्रतिनिधी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयाने पुराव्या अभावी निर्दोष ठरविले आहे. तपास यंत्रणांनी केलेले कोणतेही आरोप सरकारी वकील...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा
शनि शिंगणापूर गैरव्यवहार प्रकरणी दोन कर्मचारी जाळ्यात
वडगाव मावळमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट; तातडीने बंद करण्याची भाजपची मागणी
'जावयाला अडकवण्यासाठी पोलिसांनीच तरुणी पाठवल्या'
खराडी परिसरासह शहरातील खाजगी पार्ट्या पोलिसांच्या रडावर
दिव्या देशमुख हिचे नागपुरात उत्स्फूर्त स्वागत

Advt