- राज्य
- कारवर ट्रे ठेऊन कबुतरांना खायला घालणाऱ्यावर कडक कारवाई
कारवर ट्रे ठेऊन कबुतरांना खायला घालणाऱ्यावर कडक कारवाई
गाडी जप्त करून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबई: प्रतिनिधी
न्यायालय, महापालिका आणि पोलिसांच्या सक्त ताकिदीला न जुमानता कारवर ट्रे ठेऊन कबुतरांना खायला घालणाऱ्याची गाडी पोलिसांनी जप्त केली असून न्यायालयाच्या अवमानाबद्दल शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून नोटीसही बजावली आहे.
लालबाग येथील महेंद्र संकलेचा यांनी न्यायालयाचा आदेश न जुमानता दादर कबुतरखान्याजवळ येऊन कबुतरांना धान्य खाऊ घातले. स्थानिकांनी त्यावर आक्षेप घेताच, मी कबुतरखान्यात खाणे टाकले नाही. स्वतःच्या कारवर ट्रे ठेऊन खायला. घालतो आहे. अजून बारा गाड्या घेऊन येऊन खायला घालीन, असा माज त्यांनी दाखवला.
त्यानंतर पोलिसांनी या संकलेचा यांचा माज उतरविण्याचे काम केले आहे. यापूर्वी देखील काही कबुतरप्रेमी आणि मुख्यतः जैन समाजाने दादर कबुतरखान्यावरील ताडपत्री फाडून कबुतरांना धान्य घातले होते. पोलिसांनी समजुतीची भूमिका घेऊनही जमाव आक्रमक होता. पोलिसांनी संकलेचा यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे अशा प्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे.