देशभर शिकवला जाणार छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास

एनसीइआरटीने पाठ्यपुस्तकात केले मोठे फेरबदल

देशभर शिकवला जाणार छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास

मुंबई: प्रतिनिधी 

आतापर्यंत केवळ मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकविला जाणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आता देशभरातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घेतला आहे. परिषदेने पाठ्यपुस्तकांमध्ये मोठे फेरबदल केले असून मराठ्यांच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे. 

एनसीईआरटीने शालेय अभ्यासक्रमासाठी बनवलेल्या पाठ्यपुस्तकात बाबराचा सर्रास कत्तली करणारा अत्यंत क्रूर आक्रमक, असे करण्यात आले आहे. अकबराचे वर्णन एक सहिष्णु पण क्रूर सम्राट म्हणून करण्यात आले आहे तर औरंगजेबाचे वर्णन निर्दयी आणि कट्टर धार्मिक प्रवृत्तीचा शासक, असे करण्यात आले आहे. मराठ्यांच्या इतिहासाचा या पुस्तकात गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे. मुघल राजवटीत धार्मिक असहिष्णुतेच्या अनेक घटना घडल्याचे पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. 

पाठ्यपुस्तकातील या फेरबदलांमुळे वाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन एनसीईआरटीने आधीच पुस्तकांमध्ये फेरबदल करण्याच्या कारणांचे स्पष्टीकरण दिले आहे. भूतकाळातील घटनांसाठी सध्याच्या काळात कोणी कोणाला जबाबदार धरू नये, यासाठी हे बदल करण्यात आले आहेत, असे परिषदेने नमूद केले आहे. 

हे पण वाचा  शिवछत्रपतींचे बारा किल्ले जागतिक वारसा यादीत

About The Author

Advertisement

Latest News

Advt