'जाहिरात, होर्डिंग नको, मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान द्या'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना आवाहन

'जाहिरात, होर्डिंग नको, मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान द्या'

मुंबई: प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते आणि कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून/ टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत, असे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आल्याचे भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी कळविले आहे.

होर्डिंग, बॅनर, जाहिराती कुणी  केल्यास त्यांच्यावर पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल आणि प्रसंगी शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत भरीव योगदान द्यावे, असे आवाहन सुद्धा पक्षातर्फे करण्यात येत आहे.

About The Author

Advertisement

Latest News

Advt