- राज्य
- वडगाव मावळमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट; तातडीने बंद करण्याची भाजपची मागणी
वडगाव मावळमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट; तातडीने बंद करण्याची भाजपची मागणी
पोलीस निरीक्षकांना वडगाव शहर भाजपाचे निवेदन
वडगाव मावळ/प्रतिनिधी
वडगाव शहरातील तरुणाईमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे असून हे सर्व अवैध धंदे पोलिसांनी तातडीने बंद करावेत अशी मागणी वडगाव शहर भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे याबाबत वडगाव मावळ पोलिस निरीक्षक कुमार कदम यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजप शहराध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर, श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त किरणजी भिलारे यांच्यासह माजी नगरसेवक रविंद्र म्हाळसकर, अमोल पगडे,भाजयुमो चे अध्यक्ष आतिश ढोरे, मकरंद बवरे,शरद मोरे, कल्पेश भोंडवे,विकी म्हाळसकर, नितीन ओव्हाळ, भोलेनाथ म्हाळसकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते
निवेदनात म्हटले आहे की वडगाव शहर ही तालुक्याची प्रशासकिय राजधानी आहे तसेच येथे शाळा व वरीष्ठ महाविद्यालय असल्याने येथे युवा वर्ग व तालुक्यातील नागरीकांची कायमच वर्दळ असते.शहराची ओळख सांस्कृतिक केंद्र व क्रीडापंढरी म्हणून देखील आहे आणि 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेले देवस्थान गावात आहे.
गावची ओळख व नावलौकिक वेगळ्या स्वरूपाचा आहे.परंतु मागील काही दिवसांत वडगावची ही ओळख पुसट होऊन अवैध धंदे व व्यसनाधीनतेचे शहर म्हणून होऊ पाहत आहे.भविष्यातील वाढत्या गुन्हेगारीचा हा पाया आहे.म्हणून पोलिसांनी तातडीने कारवाई करून शहरातील अवैध धंद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
,
About The Author
