'जावयाला अडकवण्यासाठी पोलिसांनीच तरुणी पाठवल्या'

माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा आरोप

'जावयाला अडकवण्यासाठी पोलिसांनीच तरुणी पाठवल्या'

जळगाव: प्रतिनिधी

आपले जावई प्रांजल खेवलकर यांना अडकवण्यासाठी पोलिसांनी छापा घालण्यापूर्वी 15 मिनिटं अमली पदार्थांसह दोन तरुणी पार्टीच्या ठिकाणी पाठवल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुणे पोलिसांवर केला आहे. 

प्रांजल उपस्थित असलेल्या पार्टीवर पोलिसांनी छापा घालण्यापूर्वी पंधरा मिनिटं दाखल झालेल्या दोघांची ओळख प्रांजल यांच्याबरोबर केवळ पंधरा दिवसांपूर्वी झाली होती. पर्समधून अमली पदार्थ काढून देणाऱ्या दोन तरुणी या दोघांबरोबरच पार्टीत आल्या होत्या. त्यानंतर केवळ पंधरा मिनिटात पोलिसांनी छापा घातला. या तरुणींनी तातडीने पर्समधून अमली पदार्थ काढून दिले. हा सगळा योगायोग कसा मानावा, असा सवाल खडसे यांनी केला आहे. 

ज्या तरुणींकडे अमली पदार्थ सापडले त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यास पोलिसांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. मात्र, ज्यांच्याकडे अमली पदार्थ नव्हते त्यांच्या अधिक तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. हे सर्व संशयास्पद आहे, असे खडसे म्हणाले. 

हे पण वाचा  रिपब्लिकन पक्षाच्या मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

दरम्यान, या प्रकारा संदर्भात काही आक्षेप घेत रोहिणी खडसे यांनी देखील पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली आहे. प्रांजल यांच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील खाजगी छायाचित्र, मजकूर जाहीर कसा करण्यात आला, असा सवाल करून रोहिणी खडसे यांनी हे कृत्य पोलिसांनीच केल्याचा आरोप केला आहे. 

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मात्र या आरोपाचा इन्कार केला. पोलीस कधीही कोणतीही गोष्ट योग्य वेळ आल्याशिवाय जाहीर करीत नाहीत. मात्र, खुद्द पोलीस ठाण्यात छायाचित्र काढण्यास किंवा चित्रीकरण करण्यास कोणालाही अटकाव करता येत नाही. त्यामुळे छाप्याच्या वेळी कोणी छायाचित्रण करून ते प्रसिद्ध केले असेल तर ती पोलिसांची जबाबदारी नाही, असा पोलीस आयुक्तांचा दावा आहे. 

 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt