'वाचाळ मंत्र्याला वेळीच आवर घालणे आवश्यक'

नागपूरमधील हिंसेवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

'वाचाळ मंत्र्याला वेळीच आवर घालणे आवश्यक'

नागपूर: प्रतिनिधी

नागपूरसारख्या शांतताप्रिय आणि सुसंस्कृत भडकलेली हिंसा दुर्दैवी आहे. महायुती सरकारमधील एक वाचाळ मंत्री सातत्याने भडकावणारी व्यक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. या वाचाळवीरांना वेळीच आवर घालण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर येथील हिमसे बाबत बोलताना दिली. 

नागपूर हे शांतताप्रिय शहर आहे. नागपूरमधील सर्व समाजाचे नागरिक एकोप्याने राहतात. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ही दीक्षाभूमी आहे. बाबा ताजुद्दीनसारख्या संतांची भक्ती सर्व समाजाच्या भाविकांकडून केली जाते. अशा शहरात असे प्रकार घडणे अयोग्य आहे, असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. 

हिंसक प्रकार सुरू होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करून त्याची व्याप्ती वाढू दिली नाही याबद्दल वडेट्टीवार यांनी पोलिसांचे कौतुक केले. मात्र, खुद्द मुख्यमंत्र्यांच्या शहरात असे प्रकार का घडतात याच्या मुळाशी जाऊन त्याला जबाबदार असणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली. 

हे पण वाचा  रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सह संस्थेच्या तज्ञ संचालक पदी पंडित मिसाळ!

About The Author

Advertisement

Latest News

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे
पंढरपूर: प्रतिनिधी पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे...
'गुजरात म्हणजे काही पाकिस्तान नाही...'
ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ शं.ना. नवलगुंदकर यांचे निधन 
'...मराठीची तळमळ तर उद्धव यांच्या भाषणात सत्तेची मळमळ'
माजी मंत्री अशोक पाटील डोणगावकर यांचे निधन
'मराठीबद्दल शब्दही न काढता सत्ता गेल्याचे रडगाणे"
'हिंदीची सक्ती ही मुंबई महाराष्ट्र पासून वेगळी काढण्याची चाचपणी'

Advt