- राज्य
- वडगाव मावळ न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीच्या कामास अखेर मंजुरी
वडगाव मावळ न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीच्या कामास अखेर मंजुरी
वकिलांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश
वडगाव मावळ /प्रतिनिधी
वडगाव मावळ न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीच्या कामास अखेर मंजुरी मिळाली असून या निर्णयामुळे वकिलांमध्ये व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दीर्घकाळापासून न्यायालयाच्या सोयीसुविधा वाढवण्याची मागणी होत होती. न्यायप्रक्रिया अधिक वेगवान व परिणामकारक करण्यासाठी तसेच वकिलांना, न्यायप्रेमी नागरिकांना सुसज्ज सुविधा मिळाव्यात यासाठी या नव्या इमारतीचे काम अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
या मंजुरीसाठी वडगाव मावळ बार असोसिएशनने सातत्यपूर्ण प्रयत्न केले. अध्यक्ष ॲड. प्रताप शेलार, उपाध्यक्ष ॲड. शैलेश पडवळ, सचिव ॲड. अमोल दाभाडे,ॲड आकाश ढोरे, ॲड हर्षद देशमुख सदस्य व कार्यकारिणी यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांना माजी अध्यक्ष ॲड. रविंद्र दाभाडे, ॲड. राजेंद्र गाडे पाटील, ॲड. निलीमा खिरे, ॲड. संजय वांद्रे, ॲड. यशवंत गोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच सर्व सहकारी वकिलांचा पाठिंबा आणि जेष्ठ वकिलांचे मार्गदर्शनही या प्रक्रियेत महत्त्वाचे ठरले.
अध्यक्ष ॲड. प्रताप शेलार यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीची आवश्यकता गेली अनेक वर्षे भासत होती. अखेर या कामाला मंजुरी मिळाल्याने वडगाव मावळ न्यायप्रक्रियेचा नवा अध्याय सुरू होईल. यामध्ये सर्व वकिलांचे योगदान आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे आहे.”उपाध्यक्ष ॲड. शैलेश पडवळ यांनी सांगितले की, “या इमारतीमुळे न्यायप्रक्रिया अधिक गतीमान होईल. न्यायालयीन कामकाज सुलभ करण्यासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. हे यश हे केवळ आमचे नसून संपूर्ण वकिल बांधवांचे आहे.”
नव्या इमारतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा, न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक सोयी, वकिलांसाठी कार्यक्षम कार्यालयीन व्यवस्था यांचा समावेश असणार आहे. यामुळे प्रलंबित खटले जलदगतीने निकाली काढणे सोपे होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
About The Author
