'अमित शहा यांची भेट राजकीय नव्हे तर...'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण 

'अमित शहा यांची भेट राजकीय नव्हे तर...'

मुंबई; प्रतिनिधी

आपला नुकताच पार पडलेला दिल्ली दौरा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट कोणत्याही राजकीय कारणासाठी नव्हती तर गृह विभागाशी संबंधित विषयांसाठी होती, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

सध्या विविध कारणांनी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केलेले कौतुक व सत्कार, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेली टीका, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाढती जवळीक, शिंदे आणि फडणवीस यांच्यातील दुरावा याबद्दलची चर्चा, फडणवीस यांनी अचानक घेतलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांची भेट अशा विविध कारणांनी राज्यातील राजकारण चर्चेत आहे त्यामुळे राजकारण्यांच्या कोणत्याही कृतीकडे राजकीय दृष्टीने बघितले जात आहे. 

देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा आणि अमित शहा यांच्याबरोबर झालेली भेट यानंतरही अशा राजकीय चर्चांना पेव फुटले. शहाणी फडणवीस यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली. मात्र, फडणवीस यांनी ही भेट राजकीय स्वरूपाची नसल्याचे स्पष्ट केले. 

हे पण वाचा  'लवकरच जाणार मंत्रिमंडळातील सहा सात मंत्र्यांचा बळी'

केंद्राने नव्याने आणलेल्या तीन कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी असलेली तयारी, त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याच्या कामाचा आढावा, नवीन कायद्यांतर्गत दाखल झालेले गुन्हे, फॉरेन्सिक व्हॅन, कोर्ट क्युबिकलची ऑनलाईन जोडणी, खटल्यांच्या सुनावणीचा कालापवे कमी करण्याचे मार्ग, प्रलंबित खटल्यांची जलद गतीने सुनावणी करण्याचे उपाय अशा गृह विभागाशी संबंधित अनेक विषयांवर अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पण निर्णयाबद्दल समाधान

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यातील महत्त्वाचा आरोपी तहव्वूर राणा याला भारताच्या ताब्यात देण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे फडणवीस यांनी स्वागत केले. शेकडो भारत यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेला राणा हा आमच्या आश्रयाखाली असल्यामुळे त्याला भारताकडे सोपवण्यात येणार नाही, अशी अमेरिकेची भूमिका होती तर, राणा हा भारताचा आरोपी असून त्याला शिक्षा करणे आवश्यक असल्यामुळे त्याला उषा करणे गरजेचे आहे, अशी भारताची भूमिका. ही भूमिका अमेरिकेच्या गळी उतरवण्यात यशस्वी ठरल्याबद्दल फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

पिंपरी - चिंचवड स्मार्ट सिटी आणि महापालिका इंटीग्रेटेड  सॉफ्टवेअर वर्षाअखेरीस कार्यान्वित पिंपरी - चिंचवड स्मार्ट सिटी आणि महापालिका इंटीग्रेटेड  सॉफ्टवेअर वर्षाअखेरीस कार्यान्वित
  मुंबई : स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार 50 टक्के आणि राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येकी 25 टक्के
'भारतातील जनता नाही तर नेतेच जातीयवादी'
'सुशांतसिंग राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच'
पुणेकरांचे प्रेम कधीही विसरू शकत नाही - अशोक सराफ
समाजाचा ढळलेला तोल सावरण्यासाठी श्री स्वामी समर्थांचे स्मरण आवश्यक!
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर पळून जाताना पोलीस झोपले होते का? : हर्षवर्धन सपकाळ
औंध रुग्णालयाच्या आवारात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे

Advt