- राज्य
- दात हे शरीराच्या आरोग्याचे प्रवेशद्वार: गोपाळ तिवारी
दात हे शरीराच्या आरोग्याचे प्रवेशद्वार: गोपाळ तिवारी
32 स्माईल दंतचिकित्सा क्लिनिकच्या वतीने वारकऱ्यांसाठी तपासणी शिबिर
पुणे: प्रतिनिधी
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज’ पालख्यांचे आगमन प्रसंगी वारकरी सेवेसाठी अनेक मंडळे, संस्था, राजकीय पक्ष इ बरोबरच वैद्यकीय व्यावसायिक पुढे येणे हे पुणे शहराच्या संस्कृतीचे प्रतिक असून जंगली महाराज रस्त्यावरील ‘३२ स्माईल्स दंत चिकित्सा क्लिनिक’चा आदर्श घेण्याजोगा असल्याचे प्रतिपादन दंत चिकित्सा व कर्क रोग तपासणी प्रसंगी राजीव गांधी स्मारक समिति अध्यक्ष, काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
या प्रसंगी ३२ स्माईल्स चे संचालक डॉ. मिलिंद दर्डा, लॉयर्स सोसायटीचे संचालक अॅड. फैयाज शेख, सहयोगी डॉ. प्रियांका राठी, डॉ. नँन्सी महाजन, डॉ. निलू व्यास, डॉ. भाव्या जैन, डॉ. घोष, ईशा राधा इ उपस्थित होते. सुमारे ५०० जणांनी चिकित्सा व उपचारांचा लाभ घेतला.
गोपाळ तिवारी पुढे म्हणाले की, ‘शरीराच्या आरोग्यात दातांचे आरोग्य हे महत्वाचे असून, दांत हे शरीर आरोग्याचे प्रवेशद्वार असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, धकाधकीच्या जीवनात डेंटीस्टकडून किमान ठरावीक वेळेनी दात क्लीनिंग करणे ही 'एकंदर आरोग्य जपणारी चांगली सवय’ असल्याचे ही सांगितले.