डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सामाजिक न्यायाच्या विचारांना चालना देणारा ठरेल : विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

राम सुतार यांच्या वर्कशॉपमध्ये तयार होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या कामाची केली पाहणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सामाजिक न्यायाच्या विचारांना चालना देणारा ठरेल : विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

नवी दिल्ली  : मुंबईतील इंदू मिल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे स्मारक तयार होत असून याठीकाणी 350 फूट उंच तयार होणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा हा सामाजिक न्यायाच्या विचारांना चालना देणारा ठरेल, अशी प्रतिक्रीया पुतळयाचे सुरू असलेले काम पाहिल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज दिली.

सुप्रसद्धि मूर्तिकार पद्मभूषण राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली गाझियाबाद येथे त्यांच्या वर्कशॉपमध्ये

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे काम जलदगतीने सुरू आहे. बनसोडे यांनी आज या पुतळयाच्या कामाची पाहणी केली, तसेच  या प्रकल्पाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. हा पुतळा तयार झाल्यावर जागतिक किर्तीमान तर ठरेलच सोबतच  देशासाठी प्रेरणादायीही ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राम सुतार यांचे चिंरजीव अनिल सुतार प्रत्यक्ष काम पाहत असून त्यांना येणाऱ्या अडचणी बनसोडे यांनी समजून घेतल्या तसेच त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासक आश्वासनही दिले. पुढील आठवडयात यासंदर्भात मुंबई येथे बैठक आयोजित करून या प्रकल्पाशी संबंधित सर्व विभागाची बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहितीही श्री बनसोडे यांनी योवळी  दिली.

हे पण वाचा  रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सह संस्थेच्या तज्ञ संचालक पदी पंडित मिसाळ!

बनसोडे यांनी पुतळ्याच्या निर्मिती प्रक्रियेची बारकाईने पाहणी केली. 100 फुट  उंच पादपीठासह 350 फूट उंचीच्या या पुतळ्याचे काम सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. पुतळ्याचा पायाचा भाग (बूट) 65 फूट लांब आणि 35 फूट रुंद असून, त्यासाठी सुमारे 20 टन धातूचा वापर होणार आहे. या पुतळयाचे काम डिसेंबर 2026 पर्यंत काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. बनसोडे यांनी पुतळ्याच्या गुणवत्तेची आणि तांत्रिक बाबींची तपासणी करून राम सुतार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

आज पार पडलेल्या बैठकीत  राम सुतार, त्यांचे चिंरजीव अनिल सुतार, महाराष्ट्र विधानसभेचे सचिव डॉ. विलास आठवले,  एमएमआरडीएचे मुख्य अभियंता प्रकाश भांगरे, उमेश साळवी, शापुरजी पालंजीचे उमेश सााळुंखे, शशी प्रभू अँड असोसिएट्सचे अतुल कैटीकवार, भदंत राहूल बोधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन समन्वय समितीचे नागसेन कांबळे, सुबोध भारत हे यावेळी उपस्थित होते.

तत्त्पुर्वी  विधानसभा उपाध्यक्ष यांनी त्यांच्या आजच्या दिल्ली दौऱ्याची सुरुवात महाराष्ट्र सदनातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केली. त्यानंतर त्यांनी  अलीपुर रोडवरील डॉ.आंबेडकर नॅशनल मेमोरियलला भेट दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारीत तसेच त्यांनी केलेल्या कार्याची माहिती या संग्रहालयाच्या माध्यमातून सामान्य माणसांही कळेल असे सुरेख संग्रहालय शासनाने बनविले असल्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटरचे संचालक आकाश पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जनपथ येथे असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटरला ही त्यांनी आज सदिच्छा भेट दिली. आज या भेटी दरम्यान महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत तयार करण्यात आलेली खासदार परिचय पुस्तिका बनसोडे यांना यावेळी  देण्यात आली.

00000

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव? सातारा पोलीस दलासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव?
सातारा, प्रतिनिधि  सातारा शहराची वाढती लोकसंख्या गुन्हेगारी वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर येत्या काळामध्ये सातारा पोलिस दलात किमान पहिल्या टप्प्यात ४००० नव्या...
मन की बात" मध्ये जुन्नरच्या रमेश खरमाळे यांच्या कामाचा गौरव
कळंब येथे आंबेडकर स्मारक उभारणार - गौतम खरात  
भाजपचे आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 'तालिका सभापती' पदी निवड!
चाकण औद्योगिक परिसरात मिनी कार्गो एअरपोर्ट उभारण्यासाठी हवाई वाहतूक मंत्री यांना निवेदन!
शेतकऱ्यांचा काटा मारणाऱ्या केळी व्यापाऱ्यांचा काटा काढू - अतुल खूपसे पाटील
रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सह संस्थेच्या तज्ञ संचालक पदी पंडित मिसाळ!

Advt