वडगाव नगरपंचायतीचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर

हरकती सूचना मागविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ; २१ ऑगस्टपर्यंत हरकती-सूचना नोंदविता येणार

वडगाव नगरपंचायतीचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर

वडगाव मावळ /प्रतिनिधी 

नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या आदेशान्वये नगरपरिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता वडगाव नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे तसेच प्रभाग संख्या निश्चित करून आराखडा विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे.येत्या २१ ऑगस्टपर्यंत हरकती-सूचना नोंदविता येतील अशी माहिती वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रवीण निकम यांनी दिली आहे.

 वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. निकम यांनी शासनाच्या आदेशानुसार प्रारूप प्रभागरचना तयार करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवली होती. निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर आज प्रारूप प्रभाग रचनेची प्रसिद्धी करण्यात  आली असून, हरकती व सूचना असल्यास दाखल कराव्यात,असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रभाग रचनेच्या वेळापत्रकानुसार दि १८ ते २१ ऑगस्ट २०२५  या कालावधीत प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रभाग रचना नोटीस व नकाशा कार्यालयीन वेळेत नगरपंचायतच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध असेल, तसेच नगरपंचायतच्या  वेबसाईटवर उपलब्ध असेल. त्यावर नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना नोंदवाव्यात. इच्छुक नागरिकांनी आपली हरकती / सूचना नगरपंचायत कार्यालयातील आवक-जावक विभागामध्ये लेखी स्वरूपात सादर कराव्यात. हरकती व सूचना सादर केलेल्या नागरिकांना स्वतंत्रपणे सुनावणीसाठी कळविण्यात येईल. मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा व सूचनांचा विचार केला जाणार नाही अशी माहिती वडगाव नगरपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हे पण वाचा  'ट्रम्प यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राजकारणातील जोकर'

वडगाव नगरपंचायत हद्दीत पूर्वीप्रमाणेच १७ प्रभाग असून, रचनेमध्येही फारसा बदल झालेला दिसत नाही. तसेच प्रभागांची व सदस्यांची संख्याही १७असल्याचे यामुळे निश्चित झाले आहे. हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत दाखल झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी होणार असून, त्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यावर अंतिम प्रभाग रचना २६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Advertisement

Latest News

वडगाव नगरपंचायतीचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर वडगाव नगरपंचायतीचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर
वडगाव मावळ /प्रतिनिधी  नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या आदेशान्वये नगरपरिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता वडगाव नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग...
शिलेदार वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठानची 'लोहगड मोहीम' फत्ते
शिंदे गटाच्या भाजपामध्ये विलिनीकरणाला सोलापुरातून सुरुवात
पहिल्या 'खेलोत्सव पॅरा एडिशन - २०२५' स्पर्धांचा दिमाखदार समारोप
उलवे येथे सिडको उभारणार 'पंतप्रधान एकता मॉल'
'पुण्यातील प्रमुख पर्यटनस्थळांसाठी ऑनलाइन बुकिंग अनिवार्य'
अतिवृष्टीमुळे तब्बल दहा लाख एकर जमीन पाण्याखाली

Advt