- राज्य
- 'आंदोलनाच्या आगीत पोळ्या भाजू नका, तोंड भाजेल'
'आंदोलनाच्या आगीत पोळ्या भाजू नका, तोंड भाजेल'
मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
मुंबई: प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनावर आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा उद्योग विरोधकांनी करू नये. अन्यथा त्यांचे तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
सरकारला अडचणीत आणण्यासाठी सोयीची भूमिका घेऊ नका. कोणतीतरी ठाम भूमिका घ्या. जे कायदेशीर आहे ते होईलच. मात्र, विरोधकांना कोणतीही भूमिका न घेता दोन समाजात भांडणे लावून त्या आगीवर आपली पोळी भाजायची आहे, असा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
[29/08, 11:41 pm] Shree: विरोधी पक्ष कोणतीही ठाम भूमिका घेण्याऐवजी केवळ ओबीसी आणि मराठे यांच्यात वाघ उत्पन्न करण्याचे काम करत आहेत. आम्हाला मात्र संपूर्ण समाजाची इच्छा आणि प्रगती विचारात घेऊन काम करायचे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाच्या बाबतीत महायुती सरकार सकारात्मक आहे. मागील दहा वर्षात मराठा समाजाला कधीही न मिळालेल्या शैक्षणिक आणि रोजगाराच्या सुविधा आपल्या सरकारने उपलब्ध करून दिल्या आहेत. इतर कुठल्याही सरकारच्या कार्यकाळात मराठा समाजाला या सुविधा मिळालेल्या नाहीत, असा दावाही फडणवीस यांनी केला.
काही लोक ओबीसी आणि मराठा या दोन समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागील काही दिवसांपासून सुरू असलेली विधाने लक्षात घेत आहे स्पष्टपणे दिसून येत आहे. आपण काय करीत आहात ते आम्हाला कळत नाही, असे समजू नका, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यांनी आणखी परवानगी वाढवून मागितली आहे. लोकशाही पद्धतीने शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार नाकारता येत नाही. न्यायालयाने आखून दिलेल्या चौकटीत प्रशासन आंदोलनाबाबत परवानगी वाढवण्याबद्दल निर्णय घेईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.