- राज्य
- 'राज्याच्या मुख्य सचिवांवर हक्कभंग दाखल करणार'
'राज्याच्या मुख्य सचिवांवर हक्कभंग दाखल करणार'
खासदार धैर्यशील मोहिते यांनी दिला इशारा
मुंबई: प्रतिनिधी
उजनी धरणासंबंधी आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे शासकीय अधिकाऱ्यांनी न दिल्याबद्दल, मागितलेली माहिती देण्यात आली नसल्याबद्दल राज्याच्या मुख्य सचिवांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्याचा इशारा खासदार धैर्यशील मोहिते यांनी दिला आहे.
उजनी धरणातील जल पर्यटन प्रकल्पाची अंमलबजावणी, धरणातील पाण्याचे प्रदूषण आणि त्यासंबंधी केली जाणारी उपाययोजना यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मागितली होती. मात्र ही माहिती आपल्याला देण्यात आली नाही, असा खासदार मोहिते यांचा दावा आहे. त्याबद्दल हक्कभग दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
खासदार मोहिते यांच्या या विधानावर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तुमच्या पक्षाकडे तब्बल 40 वर्ष सत्ता असून देखील उजनी धरणात जल पर्यटनाची योजना राबवली गेली का, असा सवाल गोरे यांनी केला आहे.