- राज्य
- 'मराठा आंदोलकांना मुंबईत येण्याची वेळ येऊ देऊ नका'
'मराठा आंदोलकांना मुंबईत येण्याची वेळ येऊ देऊ नका'
सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना आवाहन
मुंबई: प्रतिनिधी
मराठा आंदोलकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची वेळ येऊ देऊ नका. त्यापूर्वीच आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना गळ घाला, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलकांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना केले आहे.
मराठा आरक्षण आंदोलक २७ तारखेला मुंबईला धडकणार आहेत. मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून सरसकट आरक्षण द्यावे आणि सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
आपल्या मागण्यांच्या संदर्भात मराठा आरक्षण आंदोलकांनी आठवले यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सूचना देण्याचे आवाहन केले आहे. हैदराबाद गॅझेट संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात यावे, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
मराठा आंदोलकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन आठवले यांनी या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग करण्यासाठी