- राज्य
- '... तरीही मराठा आरक्षण आंदोलक मुंबईत का, ते शिंदेंना विचारा'
'... तरीही मराठा आरक्षण आंदोलक मुंबईत का, ते शिंदेंना विचारा'
राज ठाकरे यांनी केली एकनाथ शिंदे यांची कोंडी
ठाणे: प्रतिनिधी
मागच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्न सोडवला होता ना? मग तरीही मराठा आरक्षण आंदोलक पुन्हा मुंबईत का आले, हा प्रश्न शिंदे यांना विचारा, असे माध्यम प्रतिनिधींना सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी केली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ठाणे येथील मनसे पदाधिकाऱ्यांना भेट घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना मराठा आरक्षण आंदोलनाबाबत प्रश्न विचारला. मराठा आरक्षण, मराठा मोर्चा यावरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शिंदे हेच देऊ शकतील. ते आले की त्यांना विचारा, असे ठाकरे म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शिंदे आणि शहा यांच्यात तब्बल तासभर चर्चा पार पडली. त्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर महापालिका निवडणुकीबरोबरच मराठा आरक्षणाच्या विषयावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.