'अजितदादांची दादागिरी मोडून काढणारच'

राजू शेट्टी यांचा इशारा

'अजितदादांची दादागिरी मोडून काढणारच'

कोल्हापूर: प्रतिनिधी 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या रॉबिन हूडसारखे वागू लागले आहेत. मात्र, आपण अजितदादांची दादागिरी मोडून काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. 

अवैध मुरूम उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना धमकी देतानाचा अजित पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरून पवार यांना मोठ्या प्रमाणावर टीकेचे लक्ष्य केले जात आहे. अवैध कृत्यांना पाठीशी घालण्याचा आपला उद्देश नव्हता. केवळ शांतता राहावी यासाठी आपण पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले. कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकाऱ्यांबद्दल आपल्या मनात आदरच आहे, असे स्पष्टीकरण पवार यांनी दिले आहे. त्यानंतर देखील या प्रकरणावर चर्चा आणि टीकाटिप्पणी सुरूच आहे. 

अजित पवार हे रॉबिन हूड या गुंडासारखे वागू लागले आहेत. बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घालणे, त्यासाठी अधिकाऱ्यांना धमकावणे, प्रशासनावर दबाव आणून चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडणे अशा प्रकारची दादागिरी अजितदादा करत असल्याची टीका शेट्टी यांनी केली. मात्र, ही दादागिरी आपण खपवून घेणार नाही. ती मोडून काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

हे पण वाचा  सी पी राधाकृष्णन हे बहुआयामी नेतृत्व: एकनाथ शिंदे

About The Author

Advertisement

Latest News

'निवडणूक प्रक्रिया 31 जानेवारी पूर्वी पूर्ण करा' 'निवडणूक प्रक्रिया 31 जानेवारी पूर्वी पूर्ण करा'
नवी दिल्ली: प्रतिनिधी  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया 31 जानेवारी पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत....
इंडिया ग्लोबल फॅशन शोला उत्स्फूर्त प्रतिसाद
मंगल प्रभात लोढा यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
मराठवाडा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी
महापालिका निवडणुकीत मुंबईकर घडवणार परिवर्तन
अब्जावधीच्या घोटाळ्यातील आरोपी अर्चना कुटे जेरबंद
भारत पाक सामन्यात दीड लाख कोटी रुपयांचा जुगार

Advt