- राज्य
- आंदोलकांचा महापालिका भवनासमोरच ठिय्या
आंदोलकांचा महापालिका भवनासमोरच ठिय्या
सरकार, प्रशासन सहकार्य करत नसल्याने हाल होत असल्याचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी
सरकार आणि प्रशासन सहकार्य करत नसल्यामुळे आंदोलनांचे हाल होत असल्याचा आरोप करून आंदोलकांनी महापालिका भाव समोरच ठिय्या मांडला आहे. त्यामुळे या परिसरात वाहतुकीच्या खोळंबा झाला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. आंदोलकांना सुविधा पुरवणे हे प्रशासनाचे कर्तव्य असताना देखील ते पार पाडले जात नाही. बुलेट त्यांची गैरसोय होईल, अशी पावले सरकारकडून उचलली जात आहेत. आंदोलकांनी कंटाळून मुंबई सोडावी, अशा सरकारचा डाव असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.
मध्यरात्रीपासून मुंबईत पाऊस सुरू आहे. तरीही आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात ठाण मांडून बसले आहेत. प्रशासनाकडून सहकार्य होत नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी महापालिका भावना समोरच चूल मांडून नाश्त्यासाठी पोहे बनवले. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलन रस्त्यावरच ठाण मांडून आहेत. या ठिकाणी शीघ्र कृती दल तैनात करण्यात आले आहे.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आझाद मैदानात केवळ एक दिवसाची परवानगी देण्यात आली होती. ही मुदत आणखी एका दिवसाने वाढवण्यात आली आहे. मात्र, आंदोलकांकडून अटी व शर्तींचा भंग झाल्याची तक्रार गुणवंत सदावर्ते यांनी पोलिसांकडे केली आहे.