'अंतरिम जामिनाची मुदत सात दिवस वाढवा'

अरविंद केजरीवाल यांची सर्वोच्च न्यायालयाला विनंती

'अंतरिम जामिनाची मुदत सात दिवस वाढवा'

नवी दिल्ली: प्रतिनिधी 

प्रकृतीची तपासणी करण्यासाठी आपल्या अंतरीम जामिनाची मुदत सात दिवसांनी वाढवून देण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या काळात केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. या जामीनाची मुदत एक जून रोजी संपुष्टात येत आहे. मुदत समताच केजरीवाल यांना पुन्हा कारागृहात जावे लागणार आहे. मद्य घोटाळा प्रकरणी केजरीवाल न्यायालयीन कोठडीत आहेत. 

कारागृहातून बाहेर आल्यानंतर केलेल्या तपासणीत आपले वजन सात किलो नी घटले आहे. शरीरातील किटोनची पातळी ही उंचावली आहे. डॉक्टरांनी पीइटी सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला आहे. प्रकृतीच्या या सर्व तपासण्या आणि उपचार यासाठी आपल्या स्वामीनाची मुदत सात दिवसांनी वाढवावी, अशी केजरीवाल यांची मागणी आहे. 

हे पण वाचा  'लाडकी बहीण योजनेत 4 हजार 800 रुपयांचा भ्रष्टाचार'

सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईला आव्हान 

केवळ संशयावरून केलेली अटक वैध ठरत नाही. त्यासाठी ठोस पुराव्याची आवश्यकता आहे. अरविंद केजरीवाल यांना सप्त वसुली संचालनालयाने केलेली अटक मद्य घोटाळ्यात केवळ सहभागी असल्याच्या संशयावरून करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही कारवाई अवैध आहे असा दावा करण्यात याचिका केजरीवाल यांनी आपले वकील अमित देसाई यांच्यामार्फत दाखल केली असून त्याबाबतचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. 

 

 

About The Author

Advertisement

Latest News

Advt