- राज्य
- साखळी बॉम्बस्फोट: उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
साखळी बॉम्बस्फोट: उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
कारागृहातून सोडण्यास मात्र अटकाव नाही
मुंबई: प्रतिनिधी
पश्चिम उपनगरीय रेल्वेमध्ये 11 जुलै 2006 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आरोपींना कारागृहातून मुक्त करण्यावर कोणताही अटकाव असणार नाही.
साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना निर्दोष ठरवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
या प्रकरणात आज झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष सोडण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून सर्व आरोपींना नोटीस बजावण्यात आली असून त्यांना सर्वोच्च न्यायालयात पुन्हा आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या आरोपींना कारागृहाबाहेर सोडण्यावर या समितीचा कोणताही परिणाम होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.