मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार ११ तारखेला

आज केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा होणार शपथविधी

मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार ११ तारखेला

मुंबई: प्रतिनिधी 

आज आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी समारंभात केवळ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील तर अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार ११ तारखेला होणार आहे. 

शपथविधीचा दिवस उगवला तरी देखील शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार की नाही, हे अजून गुलदस्त्यातच आहे. मात्र, आजच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार हे निश्चित मानले जात आहे. अन्यमंत्र्यांची नावे आणि खातेवाटप अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. याबाबतची घोषणा अकरा तारखेला करण्यात येणार आहे. 

अन्य मंत्र्यांची नावे आणि खातेवाटप जाहीर करताना या मंत्रिमंडळात ३३ मंत्र्यांचा समावेश असेल. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे १५, शिवसेना शिंदे गटाचे १० आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ८ मंत्री समाविष्ट असतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

हे पण वाचा  साखळी बॉम्बस्फोट: उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

About The Author

Advertisement

Latest News

Advt