अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क पूर्ण माफ

दिव्यांगांच्या धर्तीवर मिळणार एक टक्का आरक्षण

अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क पूर्ण माफ

मुंबई: प्रतिनिधी

अनुदान प्राप्त शाळांमध्ये शिकणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे दिव्यांगांच्या धर्तीवर अनाथ विद्यार्थ्यांसाठी देखील एक टक्का प्रवेश आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. 

शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क यात शंभर टक्के सवलत प्राप्त करण्यासाठी अनाथ विद्यार्थ्यांना वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असल्याचा दाखला द्यावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना ही कागदपत्र देण्यास काही अडचण आली तर शिक्षण संस्थांनी आवश्यक्य कागदपत्रांसह जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे शिफारस करावी, असे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

दिव्यांग शिक्षकांनी मागितली न्यायालयात दाद 

हे पण वाचा  'माझ्याही कुंकवाला न्याय द्या'

सातारा जिल्ह्यात दिव्यांग प्रमाणपत्र देऊन नोकरीवर रुजू झालेल्या शिक्षकांच्या दिव्यांगत्वाची चाचणी केली जात आहे. अशा शिक्षकांची संख्या 581 असून 162 शिक्षकांच्या तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी 25 शिक्षक अपात्र ठरले असून 11 शिक्षक तपासणीच्या वेळी गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाकडून या 36 शिक्षकांना नोटीस बजावण्यात आली आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेने दिलेली दिव्यांग प्रमाणपत्र शिक्षण विभाग नाकारत असल्याबद्दल दिव्यांग शिक्षकांमध्ये अस्वस्थतेची भावना आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयाविरोधात त्यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt