- राज्य
- खेवलकरच्या व्हिडिओमधील चार तरुणी पोलिसांच्या संपर्कात
खेवलकरच्या व्हिडिओमधील चार तरुणी पोलिसांच्या संपर्कात
तक्रारी दाखल झाल्यास गजाआड मुक्काम वाढणार
पुणे प्रतिनिधी
माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्याकडे असलेल्या व्हिडिओ दिसणाऱ्या तरुणींपैकी चार जणींना पोलिसांनी शोधून काढले आहे. त्यांनी खेवलकर यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्यास त्यांचा गजाआडचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे.
खराडी परिसरात रेव्ह पार्टीवर छापा घालून पोलिसांनी खेवलकर यांना अटक केली आहे. त्यानंतर केलेल्या तपासात हिवरकर यांच्या मोबाईलवर लॅपटॉप मध्ये शेकडो अश्लील छायाचित्र व चित्रण आढळून आले आहे. त्यापैकी काही चित्रफितींमध्ये स्वतः खेवलकर हे दिसत आहेत. चौघींना पोलिसांनी शोधले आहे. त्यांनी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केल्यास खेवलकर अधिक अडचणीत यऊ शकतात.
खेवलकर यांनी अनेकदा मुलींना बोलावून पार्टी केली आहे. हा मानवी तस्करीचा प्रकार आहे. मुलींना चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले गेले. त्यांना ब्लॅकमेल करण्यात आले, असे आरोप करून राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी यासंबंधी कसून तपास करावा, अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्याचे सांगितले.