- राज्य
- '... म्हणून आखले जात आहे नाथाभाऊंच्या बदनामीचे षडयंत्र'
'... म्हणून आखले जात आहे नाथाभाऊंच्या बदनामीचे षडयंत्र'
माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा आरोप
जळगाव: प्रतिनिधी
मंत्रिमंडळातील मंत्री आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांना जाळ्यात अडकविणाऱ्या हनी ट्रॅप प्रकरणापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी म्हणून नाथाभाऊंच्या बदनामीचे षडयंत्र आखले जात असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार खडसे यांनी केला.
आपण आपल्या राजकीय कारकीर्दीत विषारी सापांची पिल्ले असलेल्या लोकांना मोठे केले, अशी खंत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. खडसे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते.
मंत्री गिरीश महाजन यांच्या दुष्कृत्यांच्या अनेक सीडीज प्रकाश लोढाकडे असतील. जोडे मारायचे असतील तर मला कशाला मारता? गिरीश महाजनला मारा. प्रकाश लोढाला मारा. आपण ज्यांना दूध पाजून मोठे केले, ती सापाची पिल्ले निघाली. आता तेच आपल्या विरोधात आंदोलन करत आहेत, असे खडसे म्हणाले.
आपण आपला जावई प्रांजल खेवलकर याचे कधीही समर्थन केलेले नाही. मात्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर कोणत्याही महिलेची तक्रार नसताना नेमक्या कशाच्या आधारावर त्यांच्यावर आरोप करत आहेत, असा आपला सवाल असल्याचेही खडसे यांनी नमूद केले.