'राज्यात लवकरच उडणार मराठा ओबीसी संघर्षाचा भडका'

ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांचा इशारा

'राज्यात लवकरच उडणार मराठा ओबीसी संघर्षाचा भडका'

बारामती: प्रतिनिधी 

महाराष्ट्राला लवकरच मराठा आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या संघर्षाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा देतानाच, या संघर्षाला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील जबाबदार असतील. जरांगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची फूस आहे, असा आरोप ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला. 

जरांगे पाटील यांना संविधान कळत नाही. आरक्षण मिळविण्यासाठी दादागिरीचा उपयोग होत नाही. ते संविधानाने मिळते, असे प्रा. हाके यांनी नमूद केले. जरांगे हे मराठा आणि ओबीसी यांच्यात संघर्ष निर्माण करू पहात आहेत, असा आरोपही त्यांनी केला. 

शरद पवार यांनी फुले, शाहू, आंबेडकर यांची नावे घेऊन ओबीसी आरक्षण बुडवले. त्यांनीच जरांगे यांना रसद पुरवली, या आरोपाचा पुनरुच्चार प्रा. हाके यांनी केला. ओबीसी मतदार पवार यांच्यापासून दूर गेल्यामुळे त्यांनी मंडल यात्रेचा घाट घातला आहे. शरद पवार हे दुतोंडी मांडुळासारखे आहेत. त्यांची दुटप्पी भूमिका ओबीसी समाजाला आवडलेली नाही, अशी टीकाही त्यांनी केली. 

हे पण वाचा  एअर रायफल 10 मीटर स्पर्धेत हरियाणाच्या दीपक सैनीला सुवर्ण

अजित पवार हे जातीयवादी नेते 

अजित पवार हे जातीयवादी नेते आहेत. कारखानदार, ठेकेदार, भांडवलदार यांचे नेते आहेत, असा आरोप प्रा. हाके यांनीं केला. अजित पवार यांचा 'महाज्योती' संदर्भात सामाजिक भेदभाव मी वारंवार महाराष्ट्रासमोर आणला आहे. ते राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी शोभत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. 

वडलांचे कर्तृत्व हेच सुप्रिया सुळे यांचे भांडवल 

पवार कुटुंब हे ईस्ट इंडिया कंपनीसारखे आहे. ते कायम सत्तेत असतातम्हानून मी त्यांच्या विरोधात बोलतो. खासदार सुळे यांचे कर्तृत्व काय? कोणत्या कामगिरीमुळे त्यांना आदर्श संसद रत्न पुरस्कार मिळतो? त्यांनी कधी तळागाळातील समाजाचे प्रश्न संसदेत मांडले आहेत का, असे सवाल करतानाच प्रा. हाके यांनी वडलांचे कर्तृत्व हेच सुप्रिया सुळे यांचे राजकीय भांडवल असल्याची टीका केली. 

About The Author

Advertisement

Latest News

वडगाव नगरपंचायतीचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर वडगाव नगरपंचायतीचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर
वडगाव मावळ /प्रतिनिधी  नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या आदेशान्वये नगरपरिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता वडगाव नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग...
शिलेदार वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठानची 'लोहगड मोहीम' फत्ते
शिंदे गटाच्या भाजपामध्ये विलिनीकरणाला सोलापुरातून सुरुवात
पहिल्या 'खेलोत्सव पॅरा एडिशन - २०२५' स्पर्धांचा दिमाखदार समारोप
उलवे येथे सिडको उभारणार 'पंतप्रधान एकता मॉल'
'पुण्यातील प्रमुख पर्यटनस्थळांसाठी ऑनलाइन बुकिंग अनिवार्य'
अतिवृष्टीमुळे तब्बल दहा लाख एकर जमीन पाण्याखाली

Advt