ब्राह्मोस पाठोपाठ येत आहे नवे घातक स्वदेशी क्षेपणास्त्र

डीआरडीओकडून तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणाची तयारी पूर्ण

ब्राह्मोस पाठोपाठ येत आहे नवे घातक स्वदेशी क्षेपणास्त्र

पुणे: प्रतिनिधी

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सेनेने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारत आणि रशियाने संयुक्तरित्या विकसित केलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राने आपली क्षमता पुरेपूर सिद्ध केली आहे. त्या पाठोपाठ संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) स्टार मिसाईल प्रकल्पांतर्गत आणखी एक घातक क्षेपणास्त्र विकसित केले आहे. या क्षेपणास्त्राच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणाची तयारी डीआरडीओने पूर्ण केली आहे. हवेतून व जमिनीवरून मारा करण्याची क्षमता असलेले पूर्ण स्वदेशी बनावटीचे हे क्षेपणास्त्र नौदल, हवाईदल आणि लष्कर या तिघांनाही उपयुक्त ठरणार आहे. हे क्षेपणास्त्र ब्राह्मोसचा किफायतशीर पर्याय ठरणार आहे. 

क्षेपणास्त्राच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये क्षेपणास्त्राचे नेविगेशन सिस्टीम, कंट्रोल सिस्टीम, इंजिन असे सर्व भाग एकत्र जोडून पूर्ण क्षेपणास्त्र तयार करण्यात येते. त्यानंतर युद्धसदृश परिस्थितीमध्ये हे क्षेपणास्त्र अनेक वेळा डागण्यात येते. याद्वारे क्षेपणास्त्राची मारा करण्याची क्षमता, अचूकता आणि परिणामकारकता तपासली जाते. त्यानंतर डीआरडीओच्या अभियंत्यांकडून या चाचणीचे सखोल विश्लेषण करून ती माहिती सैन्य दलातील तज्ञांना दिली जाते. सैन्याच्या आवश्यकतेनुसार आलेल्या सूचनांप्रमाणे त्यात आणखी सुधारणा केली जाते. 

हवेतून आणि जमिनीवरून मारा करण्याच्या या क्षेपणास्त्रांच्या क्षमतेची देखील चाचणी यावेळी करण्यात येणार आहे. सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर डीआरडीओ कडून स्टार क्षेपणास्त्राचे मर्यादित प्रमाणात उत्पादन सुरू करण्यात येईल. याचा उपयोग सैन्यदलांना प्रशिक्षण देण्यासाठीही केला जाणार आहे. हे क्षेपणास्त्र ३ हजार ६२ किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करू शकते. रडारला चकवण्याची क्षमता या क्षेपणास्त्र मध्ये आहे. त्यामुळे डीआरडीओ ने विकसित केलेले हे क्षेपणास्त्र भारतीय सैन्य दलाच्या भात्यातील महत्त्वाचे अस्त्र ठरणार आहे. 

हे पण वाचा  शिवछत्रपतींचे बारा किल्ले जागतिक वारसा यादीत

About The Author

Advertisement

Latest News

विद्यार्थी आक्रमक: अभियांत्रिकीच्या निकालात घोळ असल्याचा आरोप विद्यार्थी आक्रमक: अभियांत्रिकीच्या निकालात घोळ असल्याचा आरोप
पुणे: प्रतिनिधी  नुकत्याच जाहीर झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रम परीक्षेच्या निकालात अनेक घोळ झाले असून या अभ्यासक्रमाची पुन्हा...
मोदी @11 अभियनाअंतर्गत प्रबोधन कार्यक्रम आणि वृक्षारोपण 
'अर्ज, विनंत्या बंद करा, ऑगस्ट महिन्यात निकाल देऊ'
'गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे भाजपने द्यावे स्पष्टीकरण'
गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा सर्वपक्षीय नेत्यांकडून निषेध
... म्हणून कार्यकर्ते भाजपमध्ये येतात: बावनकुळे
'केवळ काळे फासण्याचा नव्हे तर जीव घेण्याचा कट'

Advt