- राज्य
- शिवछत्रपतींचे बारा किल्ले जागतिक वारसा यादीत
शिवछत्रपतींचे बारा किल्ले जागतिक वारसा यादीत
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले सात जणांचे आभार
मुंबई: प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेले बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली असून यासाठी प्रयत्न करणाऱ्या सात जणांचे फडणवीस यांनी आभार मानले आहेत.
हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत करण्यात आला आहे.
हा टप्पा गाठण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय पुरात विभाग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची वेळोवेळी साथ लाभली. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी स्वतः युनेस्कोच्य महानिदेशकांची भेट घेऊन तांत्रिक सादरीकरण केले. मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी विकास खर्गे, भारताचे युनेस्कोमधील राजदूत विशाल शर्मा आणि पुरातत्व व संग्रहालय संचालनालयाचे अधिकारी हेमंत दळवी यांनीही त्यात सक्रिय सहभाग घेतला, असे फडणवीस यांनी नमूद केले.
या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी झालेल्यांचे आभार मानण्याबरोबरच फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले आहे.