- राज्य
- '... तर राज ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले म्हणावे लागेल'
'... तर राज ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले म्हणावे लागेल'
मनसे आणि ठाकरे गटाच्या संभाव्य युतीबाबत शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रिया
पंढरपूर: प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची समजा युती झालीच तर राज ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले असे म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. मुंबई महापालिकेत महायुतीच सत्तेवर येणार असा दावा देखील त्यांनी केला.
ठाकरे बंधू एकत्र येणार आणि मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार, याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, ही शक्यता धूसर असल्याचे शहाजी बापूंचे मत आहे. मुंबईत सध्या महायुतीला अत्यंत चांगले वातावरण असून निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेवर महायुतीच सत्तेवर येईल, असा दावा त्यांनी केला.
... म्हणून संजय राऊत उद्धव यांच्याबरोसंजय
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आमच्याबरोबर गुवाहाटीला यायचे होते. मात्र, आमच्यापैकीच तब्बल 30-35 आमदारांनी राऊत यांना आपल्या गटात सहभागी करून घेण्यास तीव्र विरोध व्यक्त केला. त्यामुळेच राऊत आज उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत आणि याच कारणाने ते सतत चिडचिड करून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असतात, असा गौप्यस्फोटही शहाजी बापूंनी केला.