खंडाळा : "मोबाईल हरवला...आणि मनात चलबिल सुरू झाली.तो पुन्हा कसा मिळणार ? " हि चिंता सतावत असताना, त्या प्रवाशाने वाहकास संपर्क केला.त्यावर तुम्ही या मोबाईल माझ्याकडे आहे.दुसऱ्या दिवशी वयोवृद्ध प्रवासी वाहकाकडे आले.मोबाईल हातात मिळताच त्यांचे डोळे पाणावले.एसटी महामंडळाच्या कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक वाहकामुळे हा सुखद प्रसंग बसस्थानकात पाहयला मिळाला.
याबाबत अधिक माहिती अशी,पारगांव खंडाळा बसस्थानकातून चालक बापूराव शेळके आणि वाहक लक्ष्मण करांडे हे वाईला बस घेवून निघाले होते.खंडाळा ते वाई मार्गावर या बसमधून प्रवासी नानासो चव्हाण ( वय 73 ) रा. सुरूर हे प्रवास करताना त्यांचा मोबाईल फोन बसमधील बाकावर विसरला.बसमध्ये कर्तव्य बजावत असताना वाहक लक्ष्मण करांडे यांना हा मोबाईल आढळला.तो मोबाईल स्वतः कडे सुरक्षित ठेवला.वाहक करांडे यांना फोन आला.तेव्हा त्यांनी मोबाईल माझ्याकडे आहे, उद्या या मोबाईल घेऊन जा असे चव्हाण यांना सांगितले.मोबाईल हरवल्यामुळे तो कसा मिळणार या चिंतेत असणाऱ्या श्री चव्हाण यांना थोडा आधार आला.दुसऱ्या दिवशी ते बसस्थानकामध्ये आले.वाहक लक्ष्मण करांडे यांनी श्री चव्हाण यांना मोबाईल दिला. त्याबदल्या वयोवृद्ध चव्हाण भावूक होत वाहकास मिठाई देताना त्यांचे डोळे पाणावले होते.वाहक श्री.करांडेंच्या प्रामाणिकपणामुळे श्री. चव्हाण यांना त्यांचा हरवलेला मोबाईल परत मिळाला.या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून, यामुळे एसटी महामंडळाची प्रतिमा उंचावली आहे. अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांमुळेच आजही सामान्य जनतेचा एसटीवर विश्वास टिकून असल्याची प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त होत आहे.
000