जयवंत कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड पॉलिटेक्निकला शैक्षणिक निरीक्षणात "अति उत्तम" श्रेणी
कराड : शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे जयवंत कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड पॉलिटेक्निक (JCEP) किल्ले मच्छिंद्रगड यांना AICTE नवी दिल्लीद्वारे मान्यता प्राप्त झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ - लोणेरे, तसेच MSBTE मुंबईशी संलग्नित, या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची सिद्धता केली आहे.
डॉ. सुरेश (बाबा) भोसले यांच्या मार्गदर्शनाने जयवंत कॉलेजला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ,मुंबई (MSBTE, मुंबई) यांच्याकडून शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या अकॅडमिक मॉनिटरिंगमध्ये महाविद्यालयाला "Very Good" (अति उत्तम) ही श्रेणी जाहीर करण्यात आली आहे. हा आपल्या कॉलेजसाठी शैक्षणिक गुणवत्तेत चढता आलेख आहे.
ही उपलब्धी ‘जयवंत’च्या उच्च शैक्षणिक मानके राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण देण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक आहे. MSBTE मुंबईने "अति उत्तम" श्रेणी जाहीर केल्याने JCEP च्या विद्यार्थी, प्राध्यापक आणि व्यवस्थापनासह संपूर्ण समुदायासाठी हा एक अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे, असे उद्गार प्राचार्य प्रा. डॉ. अनंतकुमार गुजर यांनी काढले.
000