भाजपच्या जावली तालुका महिला अध्यक्षपदी काटवलीच्या सौ. मीनाक्षी अक्षय बेलोशे यांची निवड
पाचगणी : काटवली (ता. जावळी) गावच्या सरपंच सौ. मीनाक्षी अक्षय बेलोशे यांची भारतीय जनता पार्टीच्या जावली तालुका मंडल पूर्व महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आले आहे. सौ.बेलोशे यांच्या या निवडीने जावली तालुक्यातील नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व सातारा जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे. कुडाळ येथील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्या निवडीने जावळी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सौ. मीनाक्षी बेलोशे या काटवली गावच्या विद्यमान सरपंच असून गावाच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्रीमत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या त्या समर्थक आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत व पक्ष कार्यासाठी त्यांची निवड नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुंमरे, भाजप तालुका अध्यक्ष संदीप परामने यांच्या आणि वरिष्ठांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे.
आगामी काळात भारतीय जनता पार्टी पक्ष वाढ करणे , महिला सक्षमीकरण करणे व महिला संघटित करणे या कामाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कुडाळ येथे झालेल्या बीजेपीच्या संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी वसंतराव मानकुमरे यांनी प्रमाणपत्र ,शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.
आगामी काळात आपण भारतीय जनता पार्टी महिला अध्यक्ष म्हणून काम करताना पक्ष वाढीबरोबरच सर्व महिलांना भाजपच्या झेंड्याखाली आणण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. मीनाक्षी बेलोशे यांनी सांगितले.
यावेळी माजी सभापती दत्ता गावडे, पंचायत राज ग्रामीण विकास विभाग जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप बेलोशे यांनी निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
000