यवतेश्वर घाटामध्ये पुन्हा कोसळली दरड

यवतेश्वर घाटामध्ये पुन्हा कोसळली दरड

दळणवळणाला धोका, लोखंडी जाळीचा प्रस्ताव कधी?

 

सातारा : सातारा कास रस्त्यावरील यवतेश्वर घाटाच्या दुसऱ्या वळणावर बुधवारी सकाळी पुन्हा एकदा दरड कोसळली मातीचा भराव मोठ्या प्रमाणावर खाली आल्याने येथील वाहतुकीला काही काळ अडथळा निर्माण झाला होता .या पडझडीमध्ये सातारा शहराच्या ऐतिहासिक खापरी नळ पाणीपुरवठा योजनेचे नुकसान झाले आहे .सार्वजनिक बांधकाम विभागाने घटनास्थळी येऊन तेथील दरड हटवण्याचे काम सुरू केले होते

बुधवारी सकाळी मुसळधार पावसामुळे योगेश्वर घाटातील डोंगर भागाची माती मोठ्या प्रमाणावर वाहून रस्त्यावर आली होती दुपारनंतर पावसाने काही काळ येथे उघडीप घेतली मात्र या वाहतुकीचा अडथळा तात्पुरत्या स्वरूपामध्ये दुरुस्त करण्यात आला आहेसध्या या घाट मार्गातून चारचाकी तसेच दुचाकी वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या घाटातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ सुरू असते. कास, बामणोली तसेच अनेक गावांकडे जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्याने पर्यटक आणि प्रवासी या मार्गाचा सर्रास वापर करत असतात. त्यामुळे आता घाट रस्त्यातून प्रवास करताना वाहन धारकांना सतर्क राहावे लागणार आहे.

हे पण वाचा  प्रीतिसंगम बागेतील घोणस सर्पाचा उपद्रव संपला

यवतेश्वर घाट मार्गावर दरड कोसळल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. दरम्यान, या ठिकाणी दरड कोसळल्याची माहिती प्रशासनास मिळताच प्रशासनाकडून तत्काळ दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. पावसाची संततधार सुरू असल्याने घाट मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान, या मार्गावर दरड कोसळल्याने पर्यटकांना कासकडे जाणारा मार्ग काहीकाळ बंद झाला होता तो आता पूर्ववत झाला आहे.

000

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt