महाबळेश्वर येथील धाडसी चोरीचा अल्पवाधित तपास करून तीन आरोपी केले जेरबंद
महाबळेश्वर : येथील ऑक्सिजन या बंद हॉटेलच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या वॉचमनने भंगार व्यवसायिकांच्या मदतीने हॉटेल मधील दहालाख रूपयांच्या मालाची नियोजन बद्ध चोरी केली. चोरीतुन मिळालेली रक्कम घेवुन अबुधाबी येथे पळुन निघालेल्या वॉचमनला महाबळेश्वर व सातारा गुन्हे अन्वेशन विभागाच्या पोलीस अधिकारी यांनी फिल्मी स्टाईलने तपास करून कांचन बॅनर्जी रा मुंबई या मुख्य आरोपीस मुंबई येथुन विमानातुन ताब्यात घेतले. तसेच त्यांने दिलेल्या माहीतीच्या आधारे सैदापुर सातारा येथुन करण घाडगे व गौतम घाडगे अशा तीन आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. या चोरीत सहभागी असलेल्या इतर सहा आरोपीचा तपास सुरू आहे.
बंद असलेल्या हॉटेलच्या सुरक्षा रक्षक कांचन बॅनर्जी याने सातारा सैदापुर येथील भंगार विक्रेत्याशी संपर्क साधुन हॉटेल मधील भंगार विकायचे आहे असे सांगितले भंगारवाले करण घाडगे व गौतम घाडगे हे सुरक्षा रक्षकाने दिलेल्या पत्यावर पोहचले तेथे त्यांनी २२ व २३ जुन रोजी सर्व साहीत्य हे खोलुन ठेवुन व्यवस्थीत वांधुन ठेवले या मध्ये ए सी टि व्ही संगणक या बरोबरच विविध प्रकारचे फर्निचर किचन मधील भांडी असे साधारण दहा लाखांच्या साहीत्याचा समावेश आहे बांधुन ठेवलेले साहीत्य घेवुन जाण्यासाठी दोन ट्क घेवुन आरोपी हे २५ जुन रोजी पुन्हा हॉटेल ऑक्सीजन मध्ये पोहचले बांधुन ठेवलेले सर्व साहीत्य दोन ट्क मध्ये भरून सर्वजण पसार झाले
सुरक्षा रक्षका बरोबर संपर्क होत नसल्याने हॉटेलचे मालक विशाल तोष्णीवाल व संतोष शिंदे हे हॉटेल वर पोहचले तेव्हा आपल्या हॉटेलचा सुरक्षा रक्षक गायव असल्याचे व आपल्या हॉटेल मधील साहीत्याची चोरी झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तातडीने महावळेश्वर पोलिसात चोरीची तक्रार दिली महाबळेश्वरचे पोलिस निरीक्षक बापुसाहेव सांडभोर हे वारीच्या बंदोवस्तावर होते जिल्हा पोलिस अधिक्षक तुषार दोशी यांनी तातडीने महाबळेश्वरचे पोलिस निरीक्षक यांना ताताडीने महाबळेश्वर येथे पोहचण्याचे आदेश दिले उपविभागीय पोलिस अधिकारी वाळासाहेव भालचिम व पोलिस निरीक्षक सांडभोर यांनी तातडीने घटना स्थळी भेट दिली सातारा येथील श्वान पथक व हस्तरेषा तज्ञाचे पथक देखिल हॉटेलवर पोहचले
पोलिस अधिक्षक तुषार दोशी यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली महावळेश्वर व सातारा पोलिसांनी चोरीचा वेगाने तपास केला या चोरी प्रकरणाचा मुख्य सुत्रधार कांचन बॅनर्जी हा नोकरीसाठी अबुधावी येथे जाणार होता पोलिसांनी त्याचे मोवाईल लोकशनच्या आधारे त्याची माहीती मिळविली तेव्हा तो मुंबई येथील वसई विभागात असल्याचे निष्पन्न झाल पोलिसांचे ५ जुन रोजी रात्री एक पथक तातडीने वसई कडे तर दुसरे मुंबई विमानतळाकडे रवाना झाले वसई मधील टॉवर लोकेशनच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा बॅनर्जी याचा मोवाईल बंद झाला आणि पोलिसांच्या तपासात अडथळे आले पुन्हा मोबाईलचे लोकशन मुंबई विमानतळ आले त्या नुसार पोलिसांनी पोलिसांनी सिने स्टाईल तपास सुरू केल तर आरोपी हा विमानात बसलेला आढळला सातारा व महाबळेश्वर पोलिसांनी विमानतळ सुरक्षा यंत्रणे वरोवर संकर्ष साधला परंतु सातारा पोलिसांना प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा मुंबई पोलिस विभागाशी संकर्प केला तेव्हा पुन्हा वेगाने सुत्रे हलली विमानात बसलेला सुरक्षा रक्षक बॅनर्जी यास पोलिसांनी ताव्यात घेतले
बॅनर्जी याच्या बरोवर पोलिस चर्चा करीत होते परंतु तो काही सांगत नव्हता परंतु गाडी जशी पुणे सोडुन साताराच्या दिशेन निघाली तेव्हा आरोपीने तोड अघडण्यास सुरूवात केली सुरक्षा रक्षकाने चोरीची कबुली दिली व चोरी मध्ये कोण कोण सहभागी आहे याची सर्व माहीती दिली साहीत्य कुठे आहे त्याची ही माहीती पोलिसांनी मिळाली सुरक्षा रक्षकाने दिलेल्या माहीतीच्या आधारे सैदापूर सातारा येथून करण घाडगे व गौतम घाडगे या दोन आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले याच ठीकणा वरून पोलिसांनी चोरीला गेलेल्या माला पैकी काही माल हस्तगत केला उरलेल्या साहित्याचा काही तपास लागत नव्हता अखेर पोलिसांना आपल्या पद्धतीने चौकशी केली तेव्हा सर्व आरोपीनी आपले तोंड उघडले भंगार व्यावसायिक याचा गोडाऊन मधून पोलिसांनी इतर सर्व साहित्य हस्तगत केले.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी,श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बाळासाहेब भालचिम उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोलीस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर महाबळेश्वर पोलीस ठाणे, सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली काळे, पोलीस उपनिरीक्षक रौफ इनामदार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित माने, प्रविण कांबळे, अविनाश चव्हाण, मुनीर मुल्ला, शिवाजी भिसे, अरुण पाटील, अमित झेंडे, अजय जाधव, गणेश कापरे, प्रमोद सावंत, अमोल माने, स्वप्नील कुंभार, अजित कर्णे, राकेश खांडके, सनी आवटे, अमित सपकाळ, हसन तडवी, राजू कांबळे, मोहन पवार, ओकार यादव, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, रविराज वर्णेकर, रोहित निकम, प्रविण पवार, विशाल पवार, संकेत निकम, स्वप्नील दौंड, शिवाजी गुरव, पंकज बेसके, अमृत करपे, संभाजी साळुंखे, विजय निकम, महाबळेश्वर पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार जितेंद्र कांबळे, नवनाथ शिंदे, सलिम सय्यद यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
00000000000