... तर आम्ही आमदार असून काय करायचे?

जितेंद्र आव्हाड यांचा सरकारला सवाल

... तर आम्ही आमदार असून काय करायचे?

ठाणे: प्रतिनिधी 

आपल्या जीवाला धोका असून तीन दिवसांपासून मारेकरी आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा दावा करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, जर आमचाच जीव सुरक्षित नसेल तर आम्ही आमदार असून करायचे काय, असा सवालही सरकारला केला. 

तीन दिवसांपासून काही मारेकरी आपल्यावर पाळत ठेवून आहेत. हे सर्वजण संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यत गुन्हे दाखल झालेले आरोपी आहेत, असा दावाही आव्हाड यांनी केला आहे.

आपल्याला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. लोकप्रतिनिधी असून आमचेच जीव धोक्यात असतील तर आम्ही आमदार पदावर कशाला राहू, असा आव्हाड चा सवाल आहे. 

हे पण वाचा  शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन सेना यांची युती

About The Author

Advertisement

Latest News

Advt