'स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मतपत्रिकेवर घ्या'

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची निवडणूक आयोगाकडे मागणी

'स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मतपत्रिकेवर घ्या'

पुणे: प्रतिनिधी 

मतदान यंत्रावर निवडणूक घेण्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निवडणूक यंत्रणेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत पारपत्रिकांचा वापर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राहुल कलाटे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

आगामी निवडणुकांच्या तयारीला सध्या वेग आला आहे. मात्र, या निवडणुका मतदान यंत्राद्वारे घेतल्या जाणार असून त्यात आपले मत नेमके कोणाला गेले, याची खातरजमा करून देणाऱ्या व्हीव्हीपॅट यंत्रणा समाविष्ट असणार नाही, असे सांगून निवडणूक आयोगाने निर्णय निराशा केली आहे, असे मत कलाटे यांनी व्यक्त केले आहे. 

व्हीव्हीपॅट यंत्रणा असल्याशिवाय मतदान आणि मतगणना विश्वासार्ह राहणार नाही. त्यामुळे जर व्हीव्हीपॅट यंत्रणा वापरता येणार नसेल तर पुन्हा जुन्या, अर्थात मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या पद्धतीकडे वळावे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आग्रही मागणी आहे. 

हे पण वाचा  'शेतकऱ्यांसाठी आर्थिक राजधानी एक दिवस बंद व्हावी'

मागच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळवता आले नाही. महाविकास आघाडीने मात्र चमकदार कामगिरी केली. विधानसभा निवडणुकीत मात्र उलटफेर बघायला मिळाला. महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी याचे खापर मतदान यंत्रावर फोडले. विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीची मते चोरल्याचा आरोप करण्यात आला. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदान यंत्र वापरले जाणार असून त्याला व्हीव्हीपॅट यंत्रणेची जोड नाही. त्यामुळे विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. 

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेत बोलताना व्हीव्हीपॅट शिवाय मतदान यंत्रांवर मतदान घ्यायचे असेल तर निवडणुकीचा फार्स हवाच कशाला? तुम्हाला हवा तो निकाल लावून टाका, असे उद्गार काढले आहेत. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt