Sangli I राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलनाचे २४ व २५ फेब्रुवारी रोजी मिरज येथे आयोजन - कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

Sangli I राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलनाचे २४ व २५ फेब्रुवारी रोजी मिरज येथे आयोजन - कामगार मंत्री डॉ. सुरेश  खाडे

सांगली : सतरावे राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलन दि.२४ व २५ फेब्रुवारी २०२३ रोजी मिरज, जि. सांगली येथे होणार आहे. या संमेलनात सर्व कामगारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत या संमेलनाबाबत माहिती देताना केले.

बालगंधर्व नाट्य मंदिर, मिरज, जि.सांगली येथे हे  संमेलन होणार असून  शुक्रवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

या दोन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्र विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित या संमेलनाचे उद्घाटक तर कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे स्वागताध्यक्ष आहेत. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे या संमेलनाचे प्रमुख कार्यवाह आहेत.

डॉ.भवाळकर यांनी लोकसंस्कृती विषयी विपूल लेखन केले असून मराठी विश्वकोश, मराठी ग्रंथकोश आदी महत्त्वाच्या कार्यात त्यांचे योगदान आहे. तसेच नाटक, कथासंग्रह, वैचारिक, ललित लेखन, समीक्षात्मक अशा विविध प्रकारची साहित्य निर्मिती त्यांनी केली आहे.

हे पण वाचा  शनि शिंगणापूर गैरव्यवहार प्रकरणी दोन कर्मचारी जाळ्यात

संमेलनाच्या पहिल्या सत्रात ‘चला उद्योजक होऊ’ या विषयावर डॉ विठ्ठल कामत (कामत हॉटेल्स गृप लि.), गिरीश चितळे (चितळे उद्योग समूह), हनुमंतराव गायकवाड (भारत विकास गृप इंडिया लि.) या उद्योजकांची मुलाखत होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात ‘कामगार चळवळीची कथा आणि व्यथा’, ‘मराठी साहित्यात कामगार जिवनाचे चित्र शोधताना’, ‘आम्ही का लिहितो ?’, ‘व्यसनमुक्तीची लढाई’ या विषयांवर परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कवी संमेलन आणि काव्य मैफिलीचा रसिक प्रेक्षकांना आस्वाद घेता येणार आहे. निमंत्रित तसेच कामगार कवींचा कवी संमेलनात सहभाग असेल. संमेलनात कथाकथनाचे सादरीकरण होणार असून अभिरुप न्यायालय देखील भरवले जाणार आहे. आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार या अभिरुप न्यायालय कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, अशी माहिती मंत्री श्री. खाडे यांनी दिली.

 

000

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

'पोलिसांवर ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करा' 'पोलिसांवर ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करा'
पुणे: प्रतिनिधी पोलिसांच्या विरोधात तक्रार देऊन 24 तासाहून अधिक कालावधी उलटला असल तरी देखील सहकाऱ्यांना बचावण्यासाठी पोलिसांकडून ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा...
'आव्हाड यांची भूमिका शरद पवार, सुप्रिया सुळे यांना मान्य आहे का?'
आधुनिक व्हा पण संस्कार सोडू नका: मीनाक्षी सेहरावत
'शांततापूर्ण गणेश विसर्जनासाठी सहमतीने धोरण निश्चित करावे'
सरकार साजरा करणार धरणाचा शताब्दी महोत्सव
नितीन गडकरी यांचे घर बॉम्बने उडविण्याची धमकी
'सत्ताधाऱ्यांचा काँग्रेसच्या नावाने चाललेला थयथयाट म्हणजे...'

Advt