- राज्य
- शनि शिंगणापूरच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची आत्महत्या
शनि शिंगणापूरच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची आत्महत्या
गळफास घेऊन संपवले जीवन
शनि शिंगणापूर: प्रतिनिधी
येथील जगप्रसिद्ध शनि शिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि विद्यमान उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. देवस्थानातील आर्थिक घोटाळा प्रकरणाशी या घटनेचा संबंध जोडला जात असला तरी पोलिसांनी शेटे यांना कधीही चौकशीसाठी बोलावले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
शनि शिंगणापूर देवस्थानचे बनावट मोबाईल ऍप्लिकेशन तयार करून त्याद्वारे देणगीच्या नावाखाली जमा केलेले पैसे देवस्थानात जमा न करता ते माजी पदाधिकारी, विश्वस्त आणि पुजारी यांनी हडपल्याचा आरोप आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करून पोलिसांनी अनेकांची चौकशी सुरू केली आहे.
शेटे यांच्या आत्महत्येमागे चौकशीची धास्ती असल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी पोलिसांनी मात्र, या प्रकरणात शेटे यांच्याकडे चौकशी केली नसल्याचे किंवा त्यांना समन्सही पाठवले नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढले आहे. पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.