- देश-विदेश
- आंदोलक मल्ल स्वीकारणार राजकीय पक्षांचा पाठिंबा
आंदोलक मल्ल स्वीकारणार राजकीय पक्षांचा पाठिंबा
एफआयआर दाखल होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार
कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार ब्रिज भूषण सिंह यांच्या विरोधातील आंदोलनात कोणताही राजकीय पक्ष आम्हाला पाठिंबा देत असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू, असे आंतरराष्ट्रीय ख्यातीची महिला कुस्तीगीर विनेश फोगट हिने स्पष्ट केले आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात केलेल्या आंदोलनात आंदोलन मल्लांनी राजकीय पक्षांचा पाठिंबा नाकारला होता.
नवी दिल्ली: प्रतिनिधी
कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार ब्रिज भूषण सिंह यांच्या विरोधातील आंदोलनात कोणताही राजकीय पक्ष आम्हाला पाठिंबा देत असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू, असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचा कुस्तीगीर बजरंग पुनिया याने स्पष्ट केले आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात केलेल्या आंदोलनात आंदोलन मल्लांनी राजकीय पक्षांचा पाठिंबा नाकारला होता.
ब्रिज भूषण सिंह यांच्या विरोधात सात महिला मल्लांनी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जावी यासाठी कुस्तीगिरांनी जानेवारी महिन्यात आंदोलन केले होते. त्यावेळी सिंह यांचा राजीनामा घेऊन समितीमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन क्रीडा मंत्रालयाने त्यांना दिले होते. प्रत्यक्षात सिंह यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने कुस्तीगिरांनी पुन्हा आपले आंदोलन सुरू केले आहे.
मागच्या वेळी आमच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. यावेळी आम्ही कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणार नाही. सिंह यांच्या विरोधात जोपर्यंत न्यायालयात प्राथमिक माहिती अहवाल सादर केला जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही, असा इशारा मल्लांनी दिला आहे.
जानेवारीमध्ये झालेल्या आंदोलनात राजकीय हस्तक्षेप नाकारत आंदोलक कुस्तीगिरांनी कम्युनिस्ट नेत्या वृंदा करात यांना आंदोलनाचा मंच सोडण्यास भाग पाडले होते. मात्र यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा घेण्यास तयार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. आम्ही खेळाडू आहोत. आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. मात्र आमच्या आंदोलनाला भारतीय जनता पक्ष, आम आदमी पक्ष किंवा कोणत्याही पक्षाने पाठिंबा दिला तर आम्ही तो स्वीकारू, असे आंदोलकांच्या वतीने यावेळी सांगण्यात आले आहे.