- देश-विदेश
- 'आमच्या घरात घुसून कोणी मारणार असेल तर...'
'आमच्या घरात घुसून कोणी मारणार असेल तर...'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर बैठकीला अनुपस्थित राहण्याचे सांगितले कारण

नवी दिल्ली: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष आणि आमचे विचार भिन्न आहेत. राजकारणाच्या दृष्टीने आपला भाजपला विरोध कायम आहे. मात्र आमच्या घरात घुसून कोणी मारणार असेल तर आपण कायम देशाच्या बाजूने उभे राहू. देशाचा विषय असेल तिथे राजकारण आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेवावे लागतात, असे मत ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीनचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले.
ऑपरेशन सिंदूरमागील भारताची भूमिका मांडण्यासाठी विविध देशांचा दौरा केलेल्या शिष्टमंडळाच्या प्रतिनिधी खासदारांची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केली. मात्र, व्यक्तिगत कारणासाठी दुबई येथे आल्यामुळे या बैठकीला उपस्थित राहता आले नाही, असे ओवेसी यांनी स्पष्ट केले.
या बैठकीचे निमंत्रण आपल्याला मिळाले होते. मात्र, आपले एक नातेवाईक आणि जवळचे मित्र आजारी असल्याने आपल्याला दुबई येथे यावे लागले. त्यामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही, असे ओवेसी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
परदेशात जाऊन आलेल्या प्रतिनिधींचे अनुभव जाणून घेण्याच्या दृष्टीने पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीचे आयोजन केल्याची माहिती या शिष्टमंडळापैकी एकाचे प्रमुख काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी दिली. शिष्टमंडळांनी भेट दिलेल्या देशांना भारताची भूमिका पटली असून त्यांनी भारताची भूमिका मान्य केली आहे, असेही थरूर यांनी सांगितले. या बैठकीचे स्वरूप पूर्णपणे अनौपचारिक असल्याचेही धरून यांनी स्पष्ट केले.
About The Author
Latest News
