- राज्य
- अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1339 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1339 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर
मदत व पुनर्वसन विभागाने जारी केला शासन निर्णय
On
मुंबई: प्रतिनिधी
जून महिन्यापासून आपर्यंत राज्यात सर्वत्र अतिवृष्टी आणि पूरस्थिती यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 139 कोटी 49 लाख 25 हजार रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. मदत व पुनर्वसन विभागाने या संबंधीचा शासन निर्णय जारी केला आहे.
राज्यात तब्बल तीन महिन्यापासून जोरदार पाऊस सुरू आहे. विशेषतः कमी पावसाच्या क्षेत्रातच अतिवृष्टी झाल्याचे आढळून येत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. राज्यातील तब्बल 70 लाख एकर क्षेत्र अति पावसाने बाधित झाले आहे.
शेतामध्ये कंबरेएवढे पाणी साठले असून अनेक ठिकाणी शेतातील माती वाहून गेली आहे. घरांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. अनेक ठिकाणी जनावरे देखील वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
About The Author
Latest News
23 Sep 2025 15:22:41
मुंबई: प्रतिनिधी राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती असून सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांना भेटी देऊन मदत कार्याचा आढावा घ्यावा, असे आदेश...