अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यात खडाजंगी

'गद्दार' संबोधल्यावरून उडाला भडका

अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यात खडाजंगी

मुंबई: प्रतिनिधी

पावसाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य अनिल परब आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या खडाजंगी झालेली बघायला मिळाली. परब यांनी देसाई यांचा गद्दार असा उल्लेख केल्यामुळे वादाचा भडका उडाला. अखेर सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित करावे लागले. 

मुंबईत मराठी माणसांना प्राधान्याने घरी मिळाली पाहिजेत, यासाठी कायदा करणार का असा प्रश्न अनिल परब यांनी विधान परिषदेत विचारला. त्यावर उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी, असा कायदा अस्तित्वात आहे का? तुमच्या कार्यकाळात तुम्ही असा कायदा केला होता का, असे प्रतिप्रश्न परब यांना विचारले. 

या प्रश्न, प्रतिप्रश्नांच्या गदारोळात अनिल परब यांनी देसाई यांना गद्दार असे संबोधले. त्यावर संतप्त झालेल्या देसाई यांनी, गद्दार कोणाला म्हणता? तुम्ही त्यावेळी बूट चाटत होतात, असे प्रत्युत्तर परब यांना दिले. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार गदारोळ झाला. अखेर उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी दहा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्यानंतर सभागृहाच्या कामकाजातून वादग्रस्त शब्द काढून टाकण्यात आले. 

हे पण वाचा  'गुजरात म्हणजे काही पाकिस्तान नाही...'

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

करवाढीच्या निषेधार्थ हॉटेल, रेस्टॉरंटचा १४ जुलै रोजी बंद करवाढीच्या निषेधार्थ हॉटेल, रेस्टॉरंटचा १४ जुलै रोजी बंद
मुंबई: प्रतिनिधी विविध करांमध्ये राज्य सरकारकडून करण्यात आलेली वाढ अवाजवी आणि हॉटेल, रेस्टॉरंट उद्योगाचे कंबरडे मोडणारी असल्याचा आरोप करून हॉटेल...
'श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस हे दबावतंत्र?'
ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी शहा शिंदे यांच्यात खलबते
आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मंत्रालयावर मराठा मोर्चा
'... तर विकासकांवर कठोर कारवाई करू'
सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्र महोत्सव घोषित केल्याबद्दल जल्लोष
देहूरोड‘रेड झोन’मधील समस्यांबाबत लवकर निर्णय-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advt