आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसीही रिंगणात

साखळी उपोषणाच्या आंदोलनाचा प्रारंभ

आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसीही रिंगणात

नागपूर: प्रतिनिधी 

एकीकडे इतर मागास प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू असतानाच आपले आरक्षण टिकवण्यासाठी इतर मागासवर्गीयांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी बजावले आहे. 

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. इतर मागासवर्गाचा या मागणीला ठाम विरोध आहे. मराठी जर ओबीसीमध्ये आले तर अन्य अलुतेदार, बलुतेदार जातींचे आरक्षण संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

ओबीसी आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीत धक्का लावणार नाही, अशी ग्वाही सत्ताधाऱ्यांनी दिली आहे. या शब्दाचे त्यांनी पालन करावे, अशी त्यांची मागणी आहे. या मागणीसाठी विदर्भाच्या सर्व ११ जिल्ह्यांमध्ये साखळी उपोषण सुरू असून काही काळानंतर आमरण उपोषणाचा विचार केला जाणार आहे. 

हे पण वाचा  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मराठा समाजातील ज्या लोकांकडे कुणबी मराठा, मराठा कुणबी अशा महसुली नोंदी असतील तर त्यांना इतर मागास प्रवर्गातून आरक्षण देण्यास महासंघाचा आक्षेप नाही. मात्र, सरसकट सर्व मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण देण्यास आपला विरोध आहे, असे तायवाडे यांनी सांगितले. 

दुसरीकडे पुण्यातही ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली जात आहे. त्यामध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आणि मराठ्यांना इतर मागास प्रवर्गात समाविष्ट करण्यास विरोध करण्यासाठी आंदोलनाची दिशा निश्चित केली जात आहे. 

About The Author

Advertisement

Latest News

मराठा आंदोलनाविरोधात व्यापारी संघटनेची तक्रार मराठा आंदोलनाविरोधात व्यापारी संघटनेची तक्रार
मुंबई: प्रतिनिधी दक्षिण मुंबईत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे व्यापारी आणि व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून याप्रकरणी...
'यापुढे पाणीही न पिता करणार तीव्र उपोषण'
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 'मंडल यात्रा' स्थगित
'मतांच्या राजकारणासाठी मविआकडून राज्याची कोंडी'
लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन
'आंदोलनस्थळी झालेला युवकाचा मृत्यू प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे'
गणेशविसर्जन मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर लाईट वापरण्यास बंदी

Advt