पवारांनी दिली कार्यकर्त्यांना शपथ

अत्याचार रोखण्यासाठी सजग राहण्याचे आवाहन

पवारांनी दिली कार्यकर्त्यांना शपथ

पुणे: प्रतिनिधी 

राज्यात महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सजग राहून महाराष्ट्र अत्याचार मुक्त करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. 

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी महाराष्ट्र बंद करण्यास उच्च न्यायालयाने अटकाव केल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने मूक आंदोलन करण्यात येत आहे. पुणे येथील आंदोलनाचे नेतृत्व खुद्द शरद पवार करत आहेत. या आंदोलनादरम्यान पवार यांनी कार्यकर्त्यांना अत्याचार रोखण्यासाठी सजग राहण्याची शपथ दिली. 

मी अशी शपथ घेतो की, मी हिंसाचार कधीही खपवून घेणार नाही.

हे पण वाचा  डीपीईएस मध्ये फुटबॉल स्पर्धा संपन्न

माझे घर, माझे ऑफिस जर कोणत्याही महिला, मुलीवर अत्याचार होत असेल तर त्याचा मी विरोध करून त्याविरुद्ध आवाज उठवेन.

मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधी करणार नाही.

महिलांचा सन्मान राखेन आणि पुण्यनगरी मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात महिलांसाठी अधिकाधिक सुरक्षित आणि भयमुक्त जिथे बनवण्यासाठी प्रयत्न करेन, अशी शपथ पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली. 

विरोधक बदलापूरच्या घटनेचे राजकारण करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करीत आहेत या गोष्टीचे वाईट वाटते. राज्यभरात अशा घटना घडू नयेत, अशीच आपली इच्छा आहे. प्रत्यक्षात बदलापूर सारख्या घटना राज्यात अनेक ठिकाणी घडल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे, असेही पवार म्हणाले. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt