- राज्य
- 'मराठीच्या नावावर दहशत माजवली तर...'
'मराठीच्या नावावर दहशत माजवली तर...'
भाषेच्या वादात राज्यपालांनी केली विचारणा
मुंबई: प्रतिनिधी
मराठी येत नाही म्हणून मारहाण केली तर त्याला लगेच मराठी बोलता येईल का? मराठीच्या नावाने दहशत माजवली तर राज्यात नवे गुंतवणूकदार येतील का, असे सवाल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे भाषेच्या या वादाला पुन्हा तोंड फुटण्याची शक्यता आहे.
हिंदीची सक्ती आणि मराठी अस्मिता या मुद्द्यावर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. आता त्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची देखील साथ मिळाली आहे.
महाराष्ट्रात राहणाऱ्या, उद्योग, व्यवसाय, नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आली पाहिजे, असा मनसेचा आग्रह आहे. मराठी बोलताना येणाऱ्या किंवा बोलण्यास नकार देणाऱ्या मराठी लोकांना मारहाण करण्याचे प्रकारही घडत आहेत.
आता खुद्द राज्यपाल या वादात उतरले आहेत. एखाद्या व्यक्तीला मराठी भाषा येत नाही म्हणून तिला मारहाण केली की लगेच ती घडाघडा मराठी बोलू शकेल का? भाषेच्या मुद्द्यावरून राज्यात दहशत निर्माण केली जात असेल तर राज्यात गुंतवणूकदार गुंतवणूक करण्याची तयारी ठेवतील का, असे प्रश्न राज्यपालांनी विचारले आहेत.