- राज्य
- 'सर्वच मराठ्यांना मिळणार आरक्षण'
'सर्वच मराठ्यांना मिळणार आरक्षण'
अपप्रचाराला बळी न पडण्याचे जरांगे यांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी
हैदराबाद गॅझेटियर लागू करणे हे पहिले पाऊल असून कालांतराने सर्वच मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली. मराठा समाजातील लोकांनी अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केले.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आलेले नाही. सरकारच्या शासन आदेशाचा मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कोणताही फायदा होणार नाही, असा अपप्रचार करून काही लोक मराठा समाजात फूट पाडण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
आंदोलकांच्या प्रयत्नामुळे चप्पल 58 लाख कुणबी नोंदी शोधण्यात यश आले आहे. त्यामुळे तीन कोटी लोकांना आरक्षण मिळाले आहे, असा दावा जरांगे पाटील यांनी केला. हजारो मुलींना मोफत शिक्षण आणि विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून दिल्याचेही त्यांनी नमूद केले.