- राज्य
- बारामतीत प्रशिक्षण संस्थेच्या विमानाचा अपघात
बारामतीत प्रशिक्षण संस्थेच्या विमानाचा अपघात
जीवितहानी नाही, विमानाचे किरकोळ नुकसान
On
बारामती: प्रतिनिधी
बारामती विमानतळावर रेड बर्ड एव्हिएशन या खाजगी विमान प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानाला अपघात झाला.. प्रशिक्षणार्थी वैमानिक सुरक्षित असून विमानाचे किरकोळ नुकसान झाले आहे.
शनिवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास विमानतळावरून उड्डाण केलेल्या विमानाचे टायर निखळल्याचे प्रशिक्षणार्थी वैमानिक विवेक यादव यांच्या लक्षात आले. त्यांनी इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला.
विमान खाली उतरताच टायर निखळलेले चाक वाकडे झाले. त्यामुळे विमान धावपट्टी सोडून बाजूच्या गवतात गेले. त्यामुळे त्याच्या पंखाचे काहीसे नुकसान झाले. वैमानिकाला कोणतीही इजा झाली नाही.
About The Author
Latest News
31 Aug 2025 13:22:26
मुंबई: प्रतिनिधी
दक्षिण मुंबईत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे व्यापारी आणि व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून याप्रकरणी...