- राज्य
- नाशिक पालकमंत्रीपदाच्या वादात भुजबळही सरसावले
नाशिक पालकमंत्रीपदाच्या वादात भुजबळही सरसावले
नाशिकमध्ये सर्वाधिक सात आमदार असल्यामुळे राष्ट्रवादीचा दावा
नाशिक: प्रतिनिधी
नाशिकचा पालकमंत्री मीच होणार, असे उद्गार मंत्री गिरीश महाजन यांनी दहीहंडी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना काढले. त्यामुळे पालकमंत्री पदाचा वाद आणखी उफाळून येणार असून त्यात ज्यष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या दाव्याची भर पडली आहे.
मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यापासून नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून सत्तारूढ पक्षांमध्ये वाद आहेत. नाशिकच्या पालकमंत्री पदावर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट हे दोघेही आतापर्यंत दावा करत आहेत. आता भुजबळांनीही या वादात उडी घेतली आहे.
रायगड जिल्ह्यात पक्षाचा एकमेव आमदार असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पालकमंत्री पदावर दावा करत आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक सात आमदार आमच्या पक्षाचे आहेत. त्यामुळे नाशिकचे पालकमंत्री पद मिळविण्यासाठी आग्रह धरावा, असे आपण पक्षनेतृत्वाला सांगितले आहे, असे भुजबळ म्हणाले.