- राज्य
- 'मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू करा'
'मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू करा'
मंत्रिमंडळ उपसमितीतील सदस्यांची आग्रही मागणी
मुंबई: प्रतिनिधी
मराठवाड्यातील मराठी कुणबी आहेत याला हैदराबाद गॅझेट हा भक्कम पुरावा आहे. त्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा, अशी आग्रही मागणी मराठा आरक्षणासाठी नियुक्त केलेल्या मंत्रिमंडळ उपस समितीतील सदस्यांनी केली आहे.
मराठवाड्यातील मराठा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत मागास होता. शेती, मजुरी आणि अशाच निम्न स्वरूपाच्या कामातून त्यांचा उदरनिर्वाह चालत असे, असे हैदराबाद गॅझेटमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे या गॅझेटच्या आधारावर मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील हीच मागणी केली आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये मराठवाड्यातील मराठा समाज कुणबी असल्याचा स्पष्ट निर्देश करण्यात आला आहे. त्यामुळे हैदराबाद आणि सातारा या गॅजेटची अंमलबजावणी करण्यास अजिबात मुदत दिली जाणार नाही नाही. मुंबई आणि औंध गॅझेटची अंमलबजावणी करण्यास काही मुदत दिली जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.