- राज्य
- मराठा समाजाला तात्काळ हक्काचे आरक्षण द्या
मराठा समाजाला तात्काळ हक्काचे आरक्षण द्या
जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला आम आदमी पार्टीचा पाठिंबा
मुंबई : प्रतिनिधी
आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू केलेले आमरण उपोषण आज चौथ्या दिवशी पोहोचले आहे. परंतु दुर्दैवाने, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अजूनही ठोस भूमिका घेण्यास किंवा चर्चेला पुढे येण्यास तयार नाही.
2018 मध्ये विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट संदर्भ देऊन “मराठा समाजाला आरक्षण देता येईल” अशी ठाम भूमिका घेतली होती. मात्र आज सत्ता हातात असूनही मराठा बांधवांची सरळ हेळसांड केली जात आहे, अशा पक्षाचा आरोप आहे.
भारताचे संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट चेतावणी दिली होती की, “आज तुम्हाला आरक्षणाची गरज नसली तरी भविष्यात लागेल, पण तेव्हा ते मिळणार नाही.” आज तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठा समाजाला आता तातडीने आरक्षणाची आवश्यकता आहे.
शांततेचे आंदोलन जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना पाणी, शौचालय व जेवण यांसारख्या मूलभूत सुविधा रोखण्यात येत आहेत. हा शासनाचा अमानुष आणि लज्जास्पद प्रयत्न आहे.
आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे (सामाजिक न्याय विभाग) यांनी स्पष्ट चेतावणी दिली आहे की, मराठा समाजाच्या मागण्या तात्काळ मान्य करून कायद्याच्या चौकटीत आरक्षण निश्चित केले पाहिजे. अन्यथा आंदोलनाची ज्वाला भडकून शासनालाच जबाबदार ठरावे लागेल.