'मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडणार'

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

'मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडणार'

नागपूर:: प्रतिनिधी

ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला सोडण्यात येणार असून यावर्षीचे पाणी २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सोडण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

मराठवाड्यातील जायकवाडी धरणामध्ये ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून पाणी सोडण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी फडणवीस बोलत होते. या चर्चेत सदस्य एकनाथ खडसे, बाबाजानी दुर्राणी, सुरेश धस यांनी सहभाग घेतला.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मेंढेगिरी समितीच्या समन्यायी तत्वानुसार मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडण्यात येत असते. परंतु, स्थानिक परिस्थितीनुसार पाणी सोडण्याचा कालावधी पुढे-मागे होत असतो.  न्यायालयातही मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी शासन ठाम भूमिका घेईल. पुढील काळात पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, ती पिण्याच्या पाण्याचे नियोजन करेल, असेही यावेळी सांगण्यात आले.

हे पण वाचा  श्री भागडेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मनोहर शेळके व उपाध्यक्षपदी संजना आगळे यांची बिनविरोध निवड 

About The Author

Advertisement

Latest News

कोरेगाव शहरातील महामार्गावर असलेल्या पुलांची कामे तात्काळ सुरू करा कोरेगाव शहरातील महामार्गावर असलेल्या पुलांची कामे तात्काळ सुरू करा
अपर जिल्हाधिकारी मलिकार्जुन माने यांचे रस्ते विकास महामंडळ आणि मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला आदेश, जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक   कोरेगांव...
खिंडवाडी ते शिवतीर्थ लाँगमार्च
शेतकरी केंद्रस्थानी ठेवुन बाजार समित्यांनी सुविधा पुराव्यात - जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रीक
Ahmedabad Aircrash | अहमदाबाद अपघाताचा पुण्यात परिणाम; दोन विमान रखडले!
घंटागाडी येत नसल्याने वाहात्या रस्त्यावर कचऱ्याचा गतिरोधक ; नागरिकाच्या सहनशिलतेचा उद्रेक!
बारामतीतील अतिक्रमण विरोधी कारवाईचा पथविक्रेत्यांकडून निषेध 
आषाढी यात्रा: होडी चालक, मालकांनी १५ जून पर्यंत होड्यांची नोंदणी करावी :जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद

Advt